बानाई क्रेडीट को आँपरेटीव्ह सोसायटीवर हंगामी संचालकांची निवड

दि. २८ एप्रिल २०२४ रोजी बानाई क्रेडीट को आँपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेची प्रथम सर्वसाधारण सभा, बानाई काँन्फारंस हॉल, उर्वेला कॉलोनी येथे रविवारी पार पडली. सभेचे अध्यक्ष प्रदीप नगराळे होते. या सभेत सोसायटीच्या हंगामी संचालकांची निवड झाली. यात अनुपकुमार सांगोडे, अनिल बहादुरे, अरविंद गेडाम, अजय पोहेकर, अविनाश मेश्राम, प्रदीप नगरारे, विजय उमरे, श्यामदास चव्हाण, कविता ओरके, कविता भोवते, व अमिताभ पावडे यांचा समावेश आहे. राजेंद्र थूल व विजय खापर्डे यांची हंगामी तज्ञ संचालक म्हणून निवड झाली. याशिवाय राजू भिवगडे, सुधन ढवळे, रवींद्र जनबंधू, भास्करराव खोब्रागडे व शालिनी दुबे यांची हंगामी सल्लागार म्हणून निवड करण्यात आली सभेचे संचालन विजय खापर्डे यांनी केले. प्रास्ताविक अनुपकुमार सांगोडे यांनी केले.