समाजाने उद्योजकता क्षेत्रात प्रगती कशी करावी या. विषयावरती मार्गदर्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर तर्फे, उद्योग विकासावर आधारित मार्गदर्शन शिबीर आयोजित केले.
या कार्यक्रमासाठी लाभलेले कार्यक्रमाचे उदघाटक व सत्कारमूर्ती मा. चंद्रकांत सांगलीकर, सुप्रसिद्ध उद्योजक, चेअरमन, सी. आर. एस. ग्रुप पुणे. प्रमुख पाहुणे आयु. विजय सोमकुंवर, डायरेक्टर टी.जी. एन. कार्पोरेट, सल्लागार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, दुसरे पाहुणे मा. आयु. सोहनलाल गिंडा, चेअरमन इंटरनॅशनल बुद्धिस्ट ट्रस्ट, उपस्थित होते. समाजाने उद्योजकता क्षेत्रात प्रगती कशी करावी या. विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास बानाई नागपूर सदस्य तथा युवा उद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.