स्मृतिशेष हरी नरके संवेदना अर्पण सभा संपन्न

जेष्ठ विचारवंत हरी नरके यांना बानाई, मराठा सेवा संघ, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र ऑफीसर्स फोरम व ओबीसी संघटनांचे वतीने संवेदना अर्पण सभा डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उरुवेला कॉलनी नागपूर येथे झाली संपन्न………..!

जेष्ठ विचारवंत स्मृतिशेष हरी नरके यांचे वयाच्या अवघ्या साठाव्या वर्षी निधन झाल्याने परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी झालेली आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरीता संवेदना अर्पण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिका अरुणा सबाने यांनी भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना बानाई नागपूर चे माजी उपाध्यक्ष महेंद्र राऊत यांनी हरी नरके यांना…..
विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही.
पेटन उद्दा नव्याने , हे सामर्थ्य नाशवंत नाही.
या ओळी अर्पण करून त्यांच्या लिखाण, व्याख्यान, कार्याचा आढावा घेत त्यांच्या सहवासातील भेटीचा उल्लेख करतांनाच परिवर्तनवादी चळवळीतील काही माणसांनीच दिलेल्या वेदनांचा उल्लेख करतं मतभेद असले तरीही चळवळीचे खच्चीकरण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. अशी आशा व्यक्त केली.
आयु. संजय शेंडे यांनी हरी नरके यांचे लिखाण आणि त्या लिखाणाचे परिणामावर बोलतांना ओबीसी समाजात केलेली जागृती, आरक्षणाबाबत हरी नरके यांचे आग्रही भूमिकांचा उल्लेख करुन आपली संवेदना अर्पण केली.
तर मराठा सेवा संघा तर्फे आयु. दिलीप खोडके यांनी आपली संवेदना अर्पण केली. बानाई सदस्य आयु. अमिताभ पावडे यांनी,
ही दुनिया पाषाणाची , बोलून बदलली नाही .!
मी बहर इथे शब्दांचे, नुसतेच उधळले होते.!! या ओळी अर्पण करुन स्मृतिशेष हरी नरके यांच्या सहवासातील दुर्मिळ क्षणाची मांडणी केली. आयु. संध्या राजूरकर यांनी हरी नरके यांचे जीवनात मिळालेल्या वेदना उल्लेख आपल्या संवेदना अर्पण करतांना संस्कृतीचा उदोउदो करणार्या प्रवृत्ती मरणार्या व्यक्ती बद्दल जेव्हा आपली पातळी सोडून बोलतात तेंव्हा संस्कृतीचे रुपांतर विकृतीत करणार्या प्रवृतीचा तीव्र शब्दात निषेध करत आपल्या संवेदना अर्पण केल्या. बानाई अध्यक्ष आयु अरविंद गेडाम यांनी ….. *सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधी दरवळलोच् नाही. ॠतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही !! या ओळी समर्पित करतं, त्यांच्या सहवासातील दोन- तीन प्रसंगाचा उहापोह आणि त्यांच्या भाषणाचा झालेला प्रभाव याची मांडणी करतं आपली संवेदना अर्पण केली.
जेष्ठ विचारवंत आयु. नागेश चौधरी यांनी बाळ गांगल यांनी , हे कसले फूले ही तर दुर्गंधी असा येवढ्या महान समाजसुधारका बाबत अपमान जनक, ओकलेल्या गरळी मुळे स्मृतिशेष हरी नरके यांचे लिखाण अधिकाधिक प्रगल्भता प्राप्त करू शकले. या शब्दात आपल्या संवेदना अर्पण केली.
आयु. प्रदीप आगलावे यांनी हरी नरके यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन सचिव म्हणून केलेल्या कामाचा सविस्तर माहिती पटासह उलगडतं आपली संवेदना अर्पण केली.
बानाई चे वतीने बानाई जेष्ठ सदस्य आयु. विठ्ठलराव नारनवरे यांनी आपल्या संवेदना अर्पण केली. धम्मचारिणी रमा गोरख आणि महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे वतीने आयु. सच्चिदानंद दारु़ंडे यांनी आपली संवेदना अर्पण केली.
*संवेदना अर्पण कार्यक्रम अध्यक्षा, आयुष्यमती अरुणा सबाने यांनी हरीभाऊ नरके यांच्या जीवनावर चौफेर प्रकाशझोत फिरवतं जातीनिहाय माणसे पारखल्या जाऊ नये, जाती आणि जातीनिहाय चिटकवीलेल्या प्रवृत्ती आपणच् कालबाह्य ठरवूयात .असा मोलाचा संदेश देत…..
स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही.
फाटतं आलो तरी भरजरी, किनार बाकी आहे.
आयुष्याशी अजून माझा, करार बाकी आहे.
मावळतांना लखलखण्याचा विचार बाकी आहे.
या ओळी हरीभाऊंना अर्पण करतांना स्मृतीशेष हरी नरके यांचे निधनानंतर महाराष्ट्रभर उमटते पडसाद ओबीसी सह सर्व परिवर्तनवादी चळवळीला उभारी देतील या आशावादासह आपली संवेदना अर्पण केली. संवेदना अर्पण सभेचे संचलन बानाई नागपूर सचिव यांनी तर बानाई नागपूर माजी अध्यक्ष पी. एस. खोब्रागडे यांनी आभार प्रदर्शन केले. आणि येत्या काही दिवसातच, दोन दिवसीय अतिरिक्त चिंतन शिबीर घेतल्या जाण्याचे जाहीर केले. संवेदना अर्पण कार्यक्रमात, आयु. रमेश पिसे, आयु. संजय जीवने, आयु. सविता कांबळे, सम्यक चे आयु. नरेश साखरे, कास्टर्टाईबचे अरूण गाडे, एम् एस वानखडे, जारोंडे साहेब यांच्या सह विविध संघटनांचे पदाधिकारी आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.