बानाईव्दारे महाड रणसंग्राम ” शताब्दी “ची रणभेरी

१९ मार्च २०२३ , रविवार
वेळ : दुपारी 2:00 वाजता

 

महाड क्रांती दिन : समता स्वातंत्र्य बंधुत्वाच्या हक्काचा बिगूल : स्त्रीची प्रत्यक्ष रुपात दास्यत्वातून मुक्ती, अर्थात उंबरठ्याबाहेरील मोकळा श्वास : –
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, (बानाई सभागृह) उरुवेला कॉलनी , वर्धा रोड, नागपूर)

स्वागताध्यक्ष : इंजि. अरविंद गेडाम, अध्यक्ष बानाई.
विषय : महाड क्रांती लढा ” शताब्दी महोत्सव ” साजरा करण्यासाठी आम्ही सज्ज!!

प्रास्ताविक : इंजि. महेंद्र राऊत, ( बानाई प्रवक्ते,) महाड क्रांती दिन आणि महाड क्रांतीच्या शतकीय वाटचालीचा अंतिम टप्पा व आमची जबाबदारी

कार्यक्रम अध्यक्ष : प्रा. रणजित मेश्राम
विषय : डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृलढ्याची (महाड) व मातृ-संघटनेची (स.सै.द.) शतकी वर्षाकडील वाटचाल : महाड क्रांती संगर ही समाजिक समता लढाई आणि 6 मे 1945 शे.का.फे अधिवेशनातील राज्य समाजवाद योजना, ही आर्थिक समता लढाई : दोन्हीतुन काय गमावले, काय कमावले ?
तरुणाईला काय द्यावे – तरुणाईने काय घ्यावे?:

प्रमुख वक्ते :

१) प्रा. हृषिकेश कांबळे , औरंगाबाद
विषय : महाड मुक्ती संग्राम : (दोन्ही टप्पे) विविध समाज घटकांचा सहभाग व त्याचा समाज मनावर झालेला परिणाम – दोन्ही टप्प्यातील “नेतृत्व भाषणे” व प्रसंगानुरूप “सत्याग्रह स्थगिती ” भूमिकेसह लढ्यातील प्रत्येक पैलू ठरावा चळवळीचा दीपस्तंभ ……..!

२) गीत सादरकर्ते – इंजि. नारायण जाधव, येळगावकर ( काळ्या मनुच्या, काळ्या लेकी.)

३) भिक्खुणी विजया मैत्रीय ,
विषय : महाड मुक्ती संगरातून स्त्री दास्यत्वाचा अंत आणि खऱ्या अर्थी उंबरठ्या बाहेरील मुक्त संचारला प्रारंभ…… एक ऐतिहासिक तेवढाच उपेक्षित पैलू…..!

संचलन : जयंत इंगळे
आभार : इंजि. अजय पोहेकर

 

 

आयोजन – कार्यकारिणी मंडळ, बानाई नागपूर.    
सर्वायुष्मान,

इंजि.अरविंद गेडाम-अध्यक्ष
अजय सावतकर -उपाध्यक्ष
जयंत इंगळे – सचिव
धम्मानंद मनवर , सहसचिव
अनुप सांगोडे, कोषाध्यक्ष
निलेश नाखले आ. तपा.
का. स. -अजय पोहेकर, पियुष धुळे, ज्योत्स्ना गवई.

 

सप्रेम जयभिम, १९ मार्च 2023.. महाड महामुक्ती संगर

सप्रेम जयभिम  १९ मार्च 2023.. महाड महामुक्ती संगर आदरनीय बाबासाहेबांच्या जीवनातील एक मैलाचा दगड सिद्ध झालेली ऐतहासीक घटना. भारताच्या तमाम शोषित, वंचित जनतेला न्याय, स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्व या मूल्यांची ओळख करून देऊन, त्यांच्या अस्तित्वशून्य जगण्याला अस्तित्वपूर्ण करणारा हा महासंगर आहे…. या निम्मित बनाई नागपूर ने कार्यक्रम आयोजित केलेला होता…प्रसिद्ध क्रांतिकारी विचारवंत आयु रणजितदादा मेश्राम अध्यक्षस्थानी होते.

औरंगाबाद येथील मागील तीन दशकापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभागी असलेले प्रा. ऋषिकेश कांबळे प्रमुख वक्ते होते. वंदनीय भिखुनी विजया मैत्रिय प्रमुख पाहुण्या होत्या.आयु सुधन ढवळे यांच्या संविधान उद्देशीका वाचनानन्तर,जागतिक जलजागृती सप्ताह निम्मित जलप्रतिज्ञाचे वाचन, आयु मनोज नाईक यांनी केले. आयु अशोक शंभरकर से. नि मु. अभि. यांनी वंदनीय भिखूनींना चिवर दान केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बनाई चे प्रवक्ते आयु महेंद्र राऊत सर यांनी केले .

आपल्या प्रस्तविक भाषणात आयु महेंद्र राऊत यांनी महाड आंदोलनाच्या घटना सांगताना, आंदोलनाचे प्रत्यक्ष चित्र श्रोत्यांपुढे उभे केले. त्यासोबत बनाई च्या कामगिरी बाबतचा चढता आलेख त्यांनी सांगितलं.कार्यक्रमाचे प्रभावी संचालन करताना,प्रसिद्ध साहित्यिकांच्या नोंदीचे दाखले देऊन, श्रोत्यांना महाड मुक्ती संगराच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर बसवून सभागृहात खिळवून ठेवण्याचं, काम बनाई सचिव आयु जयंत इंगळे यांनी केलं…बनाई अध्यक्ष आयु. अरविंद गेडाम यांनी, महाड मुक्ती संगराच्या च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा रणजितदादा मेश्राम यांना उद्देशून, आंबेडकरी चळवळीची दिशा नेमकी कशी असावी, बाबासाहेबाना अपेक्षित असलेली लोकशाही नेमकी कशी होती, या पैलू वर प्रकाश टाकणायासाठी अंगुलीनिर्देश केला. बानाईव्दारे महाड रणसंग्राम " शताब्दी "ची रणभेरी

यासोबतच येणाऱ्या चार वर्षात महाड मुक्ती संगराची शताब्दी साजरी करताना, काय उपक्रम असतील याबाबत सांगितले.प्रमुख वक्ते आयु ऋषिकेश कांबळे आणि वंदनीय भिखुनी विजया मैत्र्य यांच्या विषयी स्वागतपर परिचय करून देताना, त्यांन दिलेले ऐतहासिक दाखले श्रोत्यांना प्रभावीत करत होते..आयु.ऋषिकेश कांबळे यांनी त्यांच्या भाषणात महाडच्या आंदोलनातील लपून असलेल्या अनेक घटनांचे उल्लेख करून, त्याच महत्वाचे परिणाम अधोरेखित केले. ब्राम्हणेत्तर मंडळीचा आंदोलनातील सहभाग त्यांनी समजावून सांगितला. बहिस्कृत भारत मधील बाबासाहेबांच्या तत्कालीन लेखाचे संदर्भ देऊन,आंदोलनाचे दुरगामी परिणामांची चर्चा केली.वंदनीय भिखुनी मैत्र्य यांनी, महाप्रजापती गौतिमी चा 500 भिखुनी सह संघ प्रवेश ही घटना म्हणजे तथागताच्या काळापासून स्त्री सामानतेची सुरुवात कशी झाली, याचा उल्लेख करून महाड च्या आंदोलनात स्त्रियांचा सहभाग आणि बाबासाहेबांच भाषण याबाबत विस्तृत मांडणी केली. अध्यक्ष रणजित दादा मेश्राम यांनी तर श्रोत्यांना त्यांच्या वक्तृत्व शैलीने तब्ब्ल 1 तास 25 मिनिट मंत्रमुग्ध करून ठेवलं .

संविधान सभेतील बाबासाहेबांचे भाषण आणि त्यांचे दुरागामी परिणाम भारतीय समाजावर कसे झाले याचा उहापोह सरांनी केला. कालच्या ऐताहासिक घटना आठवून उद्याचा, भविष्यात काय करायला पाहिजे हे सर्व बाबासाहेबानी सांगून ठेवलं आहे. बाबासाहेबाना अपेक्षित असलेली लोकशाही त्यांनी सांगितलं.. रक्ताचा एक थेंबही न सांडता, वंचित आणि शोषितांच्या जीवनात आर्थिक आणि सामाजिक असा अमलाग्र बदल आणणारी लोकशाही, ही खरी लोकशाही असं प्रतिपादन त्यांनी केले.महाड अंदोलन संपल्यावर लगेच बाबासाहेबानी बहिस्कृत भारत सुरु केले. त्यातील अग्रलेख म्हणजे आपल्या संघर्षातून निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती आणि पुढील दिशा दर्शक कृती आरखडा याचा आदर्श असा, ठेवा असल्याचे त्यांनी सांगितलं.

शेवटी लढा संपला नसून अजूनही सुरु आहे, किंबहुना अजूनही आपण गाफिल राहू नये. उलट बाबासाहेबांनी सुचवलेल्या निर्देशप्रमाणे चळवळ सुरु ठेवणे ही वर्तमान गरज असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. देशात जे सुरु आहे, ते किती विपरीत आणि भारतीय समाजाला सामाजिक दृष्ट्या मागे नेणारे आहे, हे ते सांगत होते.. सर्व जग पुढे जात असताना, या देशातील वंचित मात्र मागे कसा राहील याचा इंतजाम वर्तमान सरकार करीत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली… शेवटी आयु अजय पोहेकार यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली…. सन्मा.बनाई सदस्यानी कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीने अधिक सफल केला. बनाई च्या कार्यक्रमास सर्व सदस्यांनी यापुढेही असाच प्रतिसाद देणे, अपेक्षित आहे… जयभिम