10th -12th Career Guidance Program BANAE NAGPUR
बानाई- विद्यार्थी करियर मार्गदर्शन कार्यक्रमांत आयु. अनिल रामटेके आयआरएस. से.नि.रेल्वे तथा मोटिव्हेशनल स्पिकर मार्गदर्शन करतांना…… जवळपास साडेतीन तास चाललेल्या या महत्वपूर्ण कार्यक्रमात इंजि. संदिप लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना शाखावार संधी बाबत चौफेर माहिती दिली. आयु. डाॅ. पल्लवी मेश्राम यांनी विस्तीर्ण स्वरूपात वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या शाखा निहाय संधी बाबत उपस्थितांना अवगत केले. सुप्रसिद्ध सीए. आयु. अश्विन कापसे यांनी वाणिज्य आणि सीए. अभ्यासक्रम संधी बाबतीत अवगत केले. आयु. सुमीत जांभूळकर यांनी कला शाखेतील अथांग संधीवर इत्यंभूत माहिती देतं या क्षेत्रातील आकर्षण वाढविले. बानाई नागपूर उपाध्यक्ष अजय सावतकर यांनी अध्यक्षीय भाषणात विविध संधींचा उलगडा केला. विचारमंचावर बानाई महाराष्ट्र उपाध्यक्ष आयु. भास्कर खोब्रागडे व बानाई नागपूर सचिव जयंत इंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या शिस्तबद्ध कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन बानाई नागपूर आंतरतपासणीस निलेश नाखले यांनी केले . विद्यार्थी पालकांची लक्षणिय उपस्थित हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य..