उद्योजकांचे चर्चा सत्र एक पाऊल पुढ़े
नोकऱ्या हा विषय आता शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आता खाजगी उद्योग हा पर्याय स्वीकारावाच् लागेल.
हा विषय घेऊन नागपूर मधील आपल्या समाजातील नवीन उद्योजक आणि युवक यांचे संपूर्ण दिवसाचे चर्चा सत्र एक पाऊल पुढ़े,
दि. 9/4/23 रोजी 11:00 वाजेपासून बानाई कॉन्फरेन्स हॉल मध्ये आयोजित करण्यात आले होते.
आंबेडकरी विचारधारी समाजातील युवकांमधे उद्योजकता बाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांना प्रेरित करणे आणि त्यांना त्या क्षेत्रात अधिक वाव कसा मिळेल यासाठी उत्पादन, संधी, बाजार, या पूरक बाबींचा योग्य विचार आवश्यक आहे. यासाठी नागपुरातील उद्योजक युवकांनी पुढाकार घेतला होता.
शासकीय विभागातील अधिकारी, उद्योग क्षेत्रातील सल्लागार, लहान, मध्यम व मोठे (MSME) उद्योग असलेले उद्योगपति, तांत्रिक क्षेत्रातील सल्लागार इ. जवळपास 100 प्रतिनिधींनी या चर्चासत्रात भाग घेतला. 6 तास चाललेल्या या चर्चासत्रात प्रत्येकाने आपापल्या क्षेत्राबद्दल 25 PowerPoint presentation सादर केले.
बानाई ने घेतलेल्या पुढाकाराचे सर्व उपस्थितांनी स्वागत व कौतुक केले व एक मोठा मंच दिल्याबद्दल आभार मानले