BRAINWAVE BURST National Level Project Competition
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची प्रोजेक्ट काॅम्पिटिशन प्रचंड उत्साहात संपन्न…… !!!!
बानाई सभागृहात दुमदुमली नवोदित उदयोन्मुख संशोधक अभियंत्याच्या कौशल्यांची रणभेरी…….. !!!
जुन्याजाणत्या आणि उदयोन्मुख अभियंत्याच्या उपस्थितीने भावनिक वातावरणात रोवली गेली आगामी संशोधनात्मक वृत्तीची मुहुर्तमेढ ….. !!!
बानाई नागपूर च्या फॅकल्टीज् नी ठेवला एकोप्याच्या फलितांचा कृती व्दारा आदर्श …… !!!
बानाई कडे ” प्रोजेक्ट काॅम्पिटिशन ” घेण्याचा बानाई सदस्य आयु. प्रणय मेश्राम (सोहमप्रभा) यांचा व्दारा प्रस्ताव आलाआणि कार्यकारिणीने ती बाब उचलून धरली आणि विविध समित्या व्दारा त्याला मुर्तरुप प्राप्त झाले असले तरी बानाई उपाध्यक्ष अभि. अजय सावतकर (कन्व्हेनर ) अभि. अॅड. प्रणय सोहमप्रभा (को. कन्व्हेनर) प्रा. संदिप काळे (को-ऑर्डिनेटर) ज्योत्स्ना गवई/चव्हाण, प्रा. संदिप लांजेवार, प्रा.लिना पाटील, अभि. रविंद्र नेमाने, अभि. विजय धाबर्डे, अभि.प्रिया मेश्राम अभि. निलेश नाखले, अभि. धम्मानंद मनवर, अभियंता पियुष धूळे यांनी बानाई महाराष्ट्र उपाध्यक्ष भास्कर खोब्रागडे व बानाई नागपूर कार्यकारिणी ने बानाई अध्यक्ष अभि. अरविंद गेडाम यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेतला. सोबतच विविध बानाई सदस्य प्राध्यापक व सदस्यांनी अल्पावधीतच प्रचंड मेहनतीने हा उपक्रम पराकोटीचा यशस्वी केला आणि उदयोन्मुख अभियंत्याच्या हृदयात बानाई व्दारा केले गेले खोलवर घर. … …… या स्पर्धेचे दरम्यान बानाईचे मोठ्या संख्येने वरिष्ठ सदस्य आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शेकडो विद्यार्थी गण हजर होते. सोबतच त्यांचे विविधांगी अतिशय संशोधनात्मक प्रोजेक्टस् आणि स्पर्धकांची किलबिलाट मनमोहक होती, दिवस कसा पार पडला कळलेच नाही. या स्पर्धेकरिता प्रमुख अतिथी आणि निरिक्षक आयु .अरविंद कुमार टीसीएस प्रमुख, व स्पर्धा निरिक्षक अभि. सुमेध बौद्ध ( डायरेक्टर टीएआरएस साॅफ्टवेअर), अभि.पलाश कोचे पर्सिसटंट ) अभि. विनय नागदेवे इलेक्ट. ऑडिटर आणि कन्सल्टंट) यांनी परिक्षण करुन दोन गटातून तीनं तीनं विजेते निवडले. ते येणेप्रमाणे…..
१)प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय चमू
२) जी एच रायसोनी तंत्रनिकेतन नागपूर चमू
३) प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय चमू
४) प्रोत्साहन – जे.एल. प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय
दुसरा गट——-
१) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर चमू
२) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चमू
३)झूलेलाल अभियांत्रिकी महाविद्यालय चमू
. अशाप्रकारे अतिशय चुरशीची ही स्पर्धा सर्व सहभागी प्रतियोगी स्पर्धकांना परमोच्च आनंद देऊन गेली.
या प्रोजेक्ट स्पर्धा निमित्ताने अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना बानाई नागपूर च्या अंतरंगाचा ठाव घेता आला. त्यांना बानाईच्या कार्याची इत्यंभूत माहीती दोन दोन ,तीन तीन गृपच्या सुमारे दहा ते पंधरा विद्यार्थी गटसमुहाला चर्चा आदानप्रदान पद्धतीने बानाई सचिव तथा कार्यकारिणी पदाधिकारी आणि बानाई नागपूरच्या सदस्यांकडून स्पर्धक अभियंत्यापर्यंत पोहचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. स्पर्धकांच्या चेहर्यावरील उत्कंठा,बानाई कार्याचे कुतुहल, आणि समाधान ही या स्पर्धेची पावती ठरली. सर्व स्पर्धक विद्यार्थीवर्गामधे बानाई विषयीं आपुलकी भावना दिसून आली.